esakal | गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह धरणांच्या क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : गत काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तीन-चार दिवसांपूर्वी मोडकसागर आणि काल तानसा धरण भरून वाहू लागले. या दोन्ही तलावांपाठोपाठ शुक्रवारी आणखी एक धरण भरल्याने मुंबई-ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुढील वर्षभर पाणीपुरवठ्याचे संकट टळल्याने त्यांना गणेशोत्सवाची एकप्रकारे भेटच मिळाली.

मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

ठाणे जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीपातळी 50 टक्केही भरली नव्हती. त्यामुळे यंदा पावसाने ओढ दिल्यास भविष्यात पाणी टंचाईचीचे सावट निर्माण झाले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह धरणांच्या क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

मनसेच्या आरोपांचं महापौरांकडून खंडन, दिलं 'या' शब्दात उत्तर

त्यातच शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यातच तीन-चार दिवसांपूर्वी मोडकसागर धरण भरुन वाहू लागले आहे. त्यानंतर तानसा आणि आता भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे भातसा धरणातील पाणीपातळी नियमीत ठेवण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास 25 सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून 69 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. भातसा धरण भरल्याने ठाणे जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे.

आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान

दरम्यान, भातसा धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांना दिल्या. तसेच जीवितहानी होवू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
----
संपादन ः ऋषिराज तायडे

loading image