
डोंबिवली : भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आता क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या कार्यकारिणी निवडणुकीत चव्हाण उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. मात्र चव्हाण हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जोरदार चर्चा आहे.