भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शेलारांना पसंती?

भाजप प्रदेशाध्यक्ष : बावनकुळे, संजय कुटे यांचीही नावे चर्चेत
BJP state president will be Ashish Shelar Chandrasekhar Bawankule Sanjay Kute politics
BJP state president will be Ashish Shelar Chandrasekhar Bawankule Sanjay Kute politics sakal

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे यांच्यापैकी एका नेत्याकडे येण्याची चिन्हे आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने शेलार हेच नवे प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहेत. पण ओबीसी नेत्यांना संधी म्हणून बावनकुळे किंवा कुटे हेही नाव पुढे येऊ शकतो.भाजपमधील ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणानुसार संघटनात्मक बदल केले जाणार असल्याचे स्पष्ट आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या प्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीला महत्त्व येणार आहे.

सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्याआधीच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच पाटील यांच्याकडची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री असलेले शेलार या मंत्रिमंडळातही असण्याची शक्यता दाट होती. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळेच त्यांना अन्य पदावर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी शेलार यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय, बावनकुळे, कुटे हेही शर्यतीत आहेत.

निर्णय दिल्लीतून होणार?

मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पावसाळी अधिवेशन आटोपताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होऊन, त्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार साधारपणे येत्या २३ ते २४ ऑगस्टपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकतो. त्याबाबतचा निर्णय दिल्लीतून होईल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

बिहारमध्ये भाजपसोबत धोका

‘‘भाजपला सत्तेचा हव्यास नाही. महाराष्ट्रात भाजपच्या आमदारांची संख्या मोठी असूनही शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. बिहारमध्ये भाजपसोबत धोका झाला आहे. खंजीर खुपसण्याच्या गोष्टी कोणीही करू नये,’’ अशा शब्दांत दरेकर यांनी विरोधकांना सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com