

BJP and Congress
ESakal
बापू सुळे
मुंबई : दोन दशकांपूर्वी मुंबई महापालिका म्हटलं की शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच सत्तेसाठी रस्सीखेच होत होती. शिवसेनेकडे ९०-९५ तर काँग्रेसकडे ७०-७५ जागांची बेगमी असायची. शिवसेनेचे राजकारण मराठी माणूस आणि हिंदुत्त्वाच्या भोवती फिरायचे, तर काँग्रेसची मदार अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीयांवर असायची. मात्र, १९९७ पासून भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा तापवतानाच उत्तर भारतीयांना जवळ केल्याने काँग्रेसला सुरुंग लागला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने भाजपचा आलेख उंचावला असून, २०१७ च्या आकडेवारीनुसार ८२ जागा झाल्या, तर काँग्रेसची घसरण होऊन ३१ पर्यंत खाली आले आहे.