भाजपच्या पोलखोल यात्रेतील रथाची तोडफोड, शिवसेनेवर आरोप

BJP Vehicle Vandalised
BJP Vehicle Vandalisede sakal

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून पोलखोल अभियान सुरू केलं जात आहे. त्यापूर्वीच भाजपच्या पोलखोल रथाची (BJP vehicle Vandalised) अज्ञातांनी तोडफोड केली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचा आहे.

BJP Vehicle Vandalised
‘पोलखोल मोहिमे’ची भाजपकडून सुरुवात

चेंबूर परिसरात भाजपच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या ४ जणांची ओळख मुंबई पोलिसांनी ओळख पटवली आहे. सीसीटीव्हीमध्ये दोन दुचाकींवर चार जण आल्याचे दिसून आले आहे. चौघांनी त्या गाडीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस या चार संशयितांचा शोध घेत असून सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीवरील क्रमांकाची ओळख पटवली जात आहे.

प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल यात्रेचा शुभारंभ होणार आहे. पण, त्यापूर्वीच या रथाची तोडफोड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी पोलखोल करत आहोत. त्यामुळे याचा त्रास महाविकास आघाडी सरकारला झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे.

संजय राऊत म्हणतात, आम्ही पाठीवर वार करत नाही. आता हेच लोक रात्रीच्या काळोखात हल्ला करता. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणूनच ही तोडफोड केली आहे. तत्काळ आरोपीला अटक केली नाहीतर आम्ही पोलिस ठाण्याखाली आंदोलन करणार आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनाच करू शकतात, असे आरोप प्रसाद लाड यांनी केले.

मुंबईत पोलखोल अभियान सुरू केलं आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. महापालिकेत ३ लाख कोटी रुपयांच्या आसपास हा भ्रष्टाचार झाला आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचं आम्ही पोलखोल करत आहोत. पण काही गुंडप्रवृत्त आमचं पोलखोल अभियान दाबण्याचा प्रयत्न करतात. आज कारवाई झाली नाहीतर आम्ही आंदोलन करणार. याप्रकरणी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असेल, असं प्रविण दरेकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com