

Thane District Central Co-operative Bank Election
ESakal
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत 'सहकार पॅनल'ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या बँकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला.