महाराष्ट्रातही लवकरच चमत्कार घडेल; मध्यप्रदेशच्या राजकारणामुळे भाजप कार्यकर्त्यांना आशा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

मध्य प्रदेशात तब्बल 20 हून अधिक आमदारांना घेऊन ज्योतिरादित्य शिंदे भाजपत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

मुंबई : मध्य प्रदेशात तब्बल 20 हून अधिक आमदारांना घेऊन ज्योतिरादित्य शिंदे भाजपत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातही लवकरच चमत्कार घडेल, अशी खात्री आमदारांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनाच असली तरी भाजप सत्तेत नेमकी केव्हा येईल याचे उत्तर मात्र माहित नसल्याचे आज सांगितले जात होते.

हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

दिल्लीतील घडामोडींमुळे आम्हाला कमालीचा दिलासा मिळाला आहे. केव्हा काय होईल, हे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेच जाणतात. असे एका महत्त्वाच्या नेत्याने नमूद केले. गेले काही दिवस लवकरच सत्ता बदलेल असा विश्‍वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. मात्र चार महिने उलटून गेल्यानंतर काहीही घडत नसल्याने भाजपत निराशा पसरली होती. आज ज्यातिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारून भाजपत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा आशेचे वातावरण पसरले आहे. शिवसेना राष्ट्रवादी, कॉंग्रेस यातील एक गट फुटेल आणि भाजपची सत्ता येईल, असे मानले जात होते. महाराष्ट्रात भाजपला संख्याबळ मिळवून देणारा ज्योतिरादित्य शिंदे कोण असे, कोणता पक्ष फुटेल याची गणिते अद्याप सांगितली जात नाहीत. मात्र दिल्ली, महाराष्ट्रात लगेच सत्ता बदल करेल, असा विश्‍वास आज भाजपच्या वर्तुळात व्यक्त केला जात होता. 

BJP will soon come to power in Maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will soon come to power in Maharashtra