esakal | हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 

हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : "हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत देशात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने या देशातील हिंदूंनाच परदेशी ठरवून त्यांना लाखोंच्या संख्येत आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहण्याची वेळ आणली आहे. त्यांच्या मदतीसाठी स्वतःला हिंदूंचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल अथवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच पुढे आलेले नाहीत. जातीय भांडण लावून पुन्हा या देशात वर्णव्यवस्था निर्माण करून बहुसंख्य हिंदूंना ब्राह्मणीव्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र सीएएच्या व एनआरसीच्या माध्यमातून रचला जात असल्या"चा आरोप ऊर्जामंत्री, डॉ. नितीन यांनी केला आहे. 

'ते' ही लहान, 'तो' नऊ वर्षांचा; त्यांनी पॉर्न पाहून त्याला नेलं जवळच्या झुडपात...

भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशात सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला घटनाच मान्य नाही. कारण त्यांना या देशात वर्णव्यवस्था निर्माण करायची आहे. वेळोवेळी राज्यघटना बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या घटना बदलण्याच्या कृतीला या देशातील जनतेने विरोध केल्याने सीएएच्याद्वारे नागरित्व सिद्द करण्यासाठी संसदेत कायदा पास करून नागरिकांना आता ते या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करावे लागणार आहे. जे हिंदू, आदिवासी, दलित, भटके विमुक्त व इतर आपले नागरिकत्व सिद्द करण्यासाठी दस्तावेज व पुरावे देऊ शकणार नाही त्यांना आपली मालमत्ता व रोजगाराला मुकावे लागून निर्वासितांच्या छावणीत जीवन जगावे लागणार आहे, असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे. 

मुंबईतील रस्त्यांवर सुरूये... ‘हा’काळाबाजार!

देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की, फक्त मतदार यादीत नाव असणे हे सिद्द करत नाही की ते या देशांचे नागरिक आहे. परंतु घटनेच्या तरतुदीनुसार फक्त या देशाचे नागरिकच मतदान करु शकतात. याचाच अर्थ असा आहे की, केंद्रातील भाजप सरकार हे अवैध नागरिकांद्वारे व घुसखोरी करणाऱ्याच्या मतदानाने सत्तेत आलं आहे. यावरून केंद्रातील भाजप सरकार सुध्दा अवैद्य आहे. यावरून एक अवैध सरकार कोणत्या आधारावर सत्तेत बसून आहे आणि नागरिकत्व सिद्ध करण्याच्या गोष्टी करू शकते का असा सवाल डॉ. राऊत यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना केला आहे. 


enslave hindus in to the Brahmanical system : nitin raut