मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवडणूक होती. या निवडणुकांमध्ये भाजपनं पुन्हा घवघवीत यश मिळवलं आहे. भाजप मीरा-भाईंदरमध्ये वर्चस्व राखण्यात यशस्वी झाला आहे.

मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवडणूक होती. या निवडणुकांमध्ये भाजपनं पुन्हा घवघवीत यश मिळवलं आहे. भाजप मीरा-भाईंदरमध्ये वर्चस्व राखण्यात यशस्वी झाला आहे.

मीरा-भाईंदरच्या महापौरपदासाठी भाजपच्या ज्योती हसनाळे आणि महाविकास आघाडीचे अनंत शिर्के हे रिंगणात होते. मात्र मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे यांची निवड झाली आहे. ज्योत्स्ना हसनाळे या ५६ मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या अनंत शिर्के यांना ३६ मतं मिळाली आहेत.  
महापौर पदासाठी एकूण ४८ हा बहुमताचा आकडा असल्यामुळे ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौरपदी निवड झाली आहे.

मोठी बातमी - सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला 'हा' निर्णय...

भाजप नगरसेवकांनी केलं शिवसेनेला मतदान: 

मीरा-भाईंदर भाजपमध्ये २ गट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यात एक गट नरेंद्र मेहता यांचा तर एक गट अपक्ष आमदार गीता जैन यांचा होता. भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेच्या बाजूनं मतदान करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि तसंच झालं. भाजपच्या तब्बल ५ नगरसेवकांनी शिवसेनेच्या बाजूनं मतदान केलं. मात्र असं असलं तरी भाजपची सत्ता पुन्हा मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आली आहे.

मोठी बातमी -  स्वतःच्याच आईला नग्न करून व्हायची मारहाण, बातमी वाचाल तर येईल डोळ्यातून पाणी   

शिवसेना - कॉंग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित:

सकाळपासूनच काही कॉंग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक नॉट रीचेबल आहेत अशी चर्चा रंगली होती. त्यावर या मतदानादरम्यान शिक्कामोर्तब झालं.  शिवसेना नगरसेविका दीप्ती भट आणि अनिता पाटील, काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि भाजपचे नगरसेवक विजय राय हे यावेळी अनुपस्थित होते. 

BJP won mira-bhayandar mayor elections
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP wins Mira Bhayandar Municipal Corporation election