स्वतःच्याच आईला नग्न करून व्हायची मारहाण, बातमी वाचाल तर येईल डोळ्यातून पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

70 वर्षाच्या आईवर तिच्याच मुलीने अत्याचार केल्याची घटना कंदिवली येथील लोखंडवाला येथे घडली आहे. 70 वर्षीय आईचा मानसिक आणि शारिरीक छळ ती करीत होती

मुंबईः ज्या माऊलीने लहानचे मोठे केले. त्या 70 वर्षाच्या आईवर तिच्याच मुलीने अत्याचार केल्याची घटना कंदिवली येथील लोखंडवाला येथे घडली आहे. 70 वर्षीय आईचा मानसिक आणि शारिरीक छळ ती करीत होती. याप्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि देखभाल, कायदा २००७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याच जन्मदात्या आईला ती मुलगी उपाशी ठेऊन तीला नग्न करून मारहाण करीत असे. याप्रकारची तक्रार त्या वृद्ध महिलीने पोलिसांत केली आहे.

रुग्णवाहिका चालकाची मुलगी झाली एमबीबीएस डॉक्‍टर

दामिनी(बदललेलेनाव) गेल्या अनेक वर्षांपासून लोखंडवाला येथील रहिवासी आहे. त्या  एमटीएनएल कामाला होत्या. त्यांचे पती आयकर अधिकारी होते. कामिनी यांना पाच मुली आहेत. पाचही मुलींची लग्न झाली आहेत.त्यातील एक मुलगी दामिनी यांच्यासोबत रहाते. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटूंबात वाद सुरू होते. या वादामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या मुलीचे आणि त्यांचे संबध कटू झाले. याचा संताप डोक्यात ठेऊन त्या मुलीने आपल्या आईचा म्हणजेच दामिनी यांचा छळ करणे सुरू केले. वादा काही वेळा इतका टोकाला गेला की, एकदा जमिनीवर पाडून तीच्या मुलीने दामिनी यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्या फ्रक्चर झाल्या होत्या. त्यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीत असा उल्लेख आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिर समिती न्यासाकडून शिवभोजन थाळीसाठी 'एवढा' निधी दिला जाणार

दामिनीची मुलगी तिला दिवसातून कधीतरी एकदा खायला देऊ लागली, तीला सतत उपाशी ठेऊ लागली. दामिनी अंघोळ करायला गेली असताना नग्न ठेऊन मारहान करत होती. दामिनी कडे असलेले आर्थिक व्यवहाराची साधने म्हणजेच डेबिट, कार्ड आधार कार्ड,  चेकबुक हिसकावून घेतली. नेहमीची मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून दामिनी यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली. पोटच्य मुलीने एवढा त्रास दिल्याने पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.

A 70-year-old mother was tortured by her daughter

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 70-year-old mother was tortured by her daughter