

Clash During Pimpri Civic Polls BJP Supporters Enter Opponent Home
Esakal
PCMC Election: राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून प्रभाग पिंजून काढला जात आहे. मतदारांना मतदानासाठी आवाहन करायला उमेदवार आणि कार्यकर्ते थेट दारात पोहोचत आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या घरात राडा केल्याची घटना घडलीय. प्रचारावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घरात घुसून शिवीगाळ केल्याचा आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.