आधी वृद्ध महिलेशी हुज्जत नंतर पोलिसांना मारहाण; पवईतील भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप

तुषार सोनवणे
Monday, 11 January 2021

पवईतील दिपू तिवारी, सचिन तिवारी, आयुष यांच्याकडून पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई - दिवसरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांसाठी कायदा सुव्यवस्था जबाबदारपणे राबवण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. याच पोलिसांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना पवई येथे घडली आहे. दिपू तिवारी, सचिन तिवारी, आयुष यांच्याकडून पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पवई पोलिस ठाण्यातील येथील नितिन खैरमोडे यांना मारहाण करण्यात आली आहे. 

 

पवईतील हिरानंदानी या परिसरात एका वृद्ध महिलेला तिघा दुचाकीस्वारांनी धडक दिली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेशी या दुचाकीस्वारांनी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यावेळी पोलिस हवालदार नितिन खैरमोडे आणि इतर पोलीस तेथे पोहचले. पोलीस या तिघांना ठाण्यात घेऊन जात होते. रिक्षाने पोलीस ठाण्यात जात असतानाच या तिघांनी नितिन खैरमोडे यांना मारहान करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर दुखापत झाली आहे. दरम्यान, तिघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघे पळून जाण्यास यशस्वी ठरले. परंतु त्यातील सचिन तिवारी यांस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP workers wrong with police in Powai

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers wrong with police in Powai

टॉपिकस
Topic Tags: