निवडणुकीच्या तोंडावर भाजपला भगवदगीतेचे स्मरण; महासभेत मांडला ठराव |Kishori pednekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला भगवदगीतेचे स्मरण; महासभेत मांडला ठराव

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला भगवदगीतेचे स्मरण; महासभेत मांडला ठराव

मुंबई : नगरसेवक पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ (corporator tenure) संपण्यासाठी अवघा महिना शिल्लक असताना भाजपला (bjp) ‘भगवदगीतेचे’ स्मरण (Bhagvadgita) झाले आहे. महानगर पालिका शाळांमध्ये (bmc school) गिता पठन केले जावे अशी ठरावाची सूचना भाजपने महासभेत मांडली आहे. या ठरावाच्या सुचनेचा या महिन्यांच्या कामाकाजात सहभाग करुन घ्यावा अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्या कडे करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...

मुंबई महानगर पालिकेच्या 2017च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपत आहे. त्यांनी एप्रिल किंवा मे महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मराठीचा गजर सुरु केला आहे. तर,भाजपने ही आता हिंदुत्वाचा राग आळवण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या योगिता कोळी यांनी महानगर पालिकेच्या शाळांमध्ये गितापठन व्हावे अशी ठरावाची सूचना मांडण्या बाबत आज महापौर किशोेरी पेडणेकर यांना पत्र दिले आहे.

भगवदगीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील. असे योगिता कोळी यांनी या सुचनेत नमुद केले आहे. ठरावाची सुचना मांडताना नगरसेवकांना त्याबाबतचे लेखी पत्र महापौरांना द्यावे लागते.कोळी यांनी हे पत्र देतानाच भगदवगीतेची प्रतही महापौरांना भेट दिली आहे.

ठरावाची सूचना रद्द करा

महानगरपालिकेच्या सभेमध्ये कोणत्याही धार्मिक शिक्षणाबाबतच्या ठरावाच्या सूचना सभागृहात स्विकारल्या जाणार नाही.असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे भाजपने मांडलेली ठरावाची सुचना रद्द करा अशी मागणी सपचे गटनेते रईस शेख यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवून केली आहे. भाजपचा मुख्य हेतू धार्मिक ध्रुविकरण व नागरिकामध्ये तणाव निर्माण करून मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा मानस आहे. असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Bjp Yogita Koli Proposal Of Bhagavadgita In General Assembly Of Mumbai Municipal Corporation Bmc News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top