'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...

'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...

डोंबिवली : राज्यात शहरीकरण वाढत असताना विकासकामांसाठी फंड (Fund development) किती उपलब्ध होतो हा एक प्रश्न नेहमी भेडसवायचा आणि खासकरुन एमएमआर रीजन (mmr region) क्षेत्रात असायचा. फंड येणे ही आतुरतेने वाट पाहणारी गोष्ट असायची. आता जसा फंड आणू शकतो तसा इतिहासात आधी कधीही आणू शकलो नव्हतो. विकास कामांचा धडाका हा तुफान आहे. आता दिल्लीतून (delhi) देखील फंड आला पाहीजे. 2024 मध्ये तो दिल्लीतून येईल असे सुतोवाच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी डोंबिवली येथे केले. दरम्यान पत्रकार परिषेदेत किरीट सोमैय्या (kirit somaiya) यांच्यावर आरोप करत वसई येथील कंपण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आदित्य म्हणाले, राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू.

'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...
वचनपूर्ती केली आता बॅनर लावा; शिवसेना खासदारांचा मनसे आमदारांना चिमटा

केंद्र शासन, राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यावतीने कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन लोकार्पण झाले. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन उद्घाटन प्रसंगी त्यांनी शाश्वत विकासकामे एमएमआर रीजन क्षेत्रात झाली पाहीजे त्यासाठी फंड हा दिल्लीतून देखील लवकरच येईल असे सांगितले. डोंबिवलीशी जुने नाते असून मुंबई ही आई आहे, तर डोंबिवली ही मावशी आहे हे हक्काने मी सांगू शकतो, त्यामुळे कल्याण डोंबिवलीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

घरी आईकडून देखील सांगितले की कल्याण डोंबिवलीला फंड द्या असेही ते म्हणाले. फंड येत आहे, शुभेच्छाही येत आहे आता दिल्लीतून देखील फंड येऊ द्या अशी कोपरखळी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यावेळी मारली. निवडणुकांमध्ये राजकीय टोलेबाजी होतच रहाते. राजकारण, श्रेयवाद न करता जनहिताची कामे झाली पाहीजे. शाश्वत विकास करायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपल्याला पुढे न्यायला लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...
शहापूर तालुक्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया

नागपूर येथील अजनी इंटर मोडल स्टेशन प्रकल्पास पर्यावरण वाद्यांनी विरोध केला असून या पर्यावरण वाद्यांना आदित्य यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. यावर मंत्री ठाकरे म्हणाले, प्रकल्पाला माझा वैयक्तिक विरोध नाही. मात्र नागपूरकरांच्या व्यथा आणि वन वाचविण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याचा विचार करीत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील 156 कारखान्यांच्या स्थलांतरणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, कुठेही रोजगाराचं नुकसान होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत ,प्रदूषण होतय त्यामुळे जिथे रेड इंडस्ट्रीसाठी जागा आहे तिथे कारखाने हलविण्यात येतील.

त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. राऊत यांनी मॅच सुरू केली आता पुढची बॅटिंग बघू संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषेदेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप करत वसई येथील कंपण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. याविषयी आदित्य म्हणाले, राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू.

केंद्राचे नाव न घेतल्याने केंद्रीय मंत्री पाटील यांची नाराजी

स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालय आणि खाडी किनारा सुशोभिकरण कामाचे उद्घाटन आदित्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या भाषणात त्यांनी केंद्राकडून निधी आल्याचा उल्लेख होत नसल्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी त्यांना तेथेच टोकत केंद्राचे नाव घ्या असा सल्ला दिला. यावर शिंदे यांनी केंद्राचा वाटा आहे म्हणूनच तुमच्या हातून नारळं फोडला असे म्हटल बाजू सावरली. यावर केंद्रीय मंत्री पाटील यांना पत्रकारांनी नाराज आहात का ? असे विचारले असता ते म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी या शहराचा समावेश स्मार्ट सिटी अंतर्गत केला आहे, त्या अंतर्गत अनेक प्रकल्प या ठिकाणी सुरु आहेत.

शहराच्या विकासाला केंद्र सरकारचा पैसा येतो मात्र केंद्र सरकारचा फलक कोठेही लावला जात नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. इथेही तसेच झाले. नेव्हल संग्रहालयासाठी केंद्र सरकारने सर्वात मोठा हिस्सा दिला असताना पालकमंत्री यांच्याकडून अनावधाने केंद्राचे नाव घेण्याचे राहून गेले त्यामुळे त्यांना सुचना केली की, केंद्राचे नाव ही घेत जात असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. जाणीवपूर्वक हे केले गेले असले तरी मी तिथे फलक लावेल असेही ते म्हणाले. शहराच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा पक्ष न पहाता एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असा सल्ला देखील पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रविंद्र फाटक, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, राजू पाटील, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वा. वि. दा. सावरकर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती. यादरम्यान डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण हे मात्र व्यासपीठावर त्यांना पालकमंत्र्यांनी बोलावून देखील गेले नाहीत. डोंबिवलीतील भाजपाचे माजी नगरसेवक नितीन पाटील, रंजना पाटील, रणजीत जोशी, वृशाली जोशी तर कॉंग्रेसचे रवी पाटील यांनी गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com