esakal | नांगरे पाटील आणि दरेकरांच्या चर्चेदरम्यान आला गृहमंत्र्यांचा कॉल, मग घडलं असं की...
sakal

बोलून बातमी शोधा

नांगरे पाटील आणि दरेकरांच्या चर्चेदरम्यान आला गृहमंत्र्यांचा कॉल, मग घडलं असं की...

कलम 325 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली. मात्र हे कलम जामीनास पात्र असल्याने, आरोपींना जामीन मंजूर झाला.

नांगरे पाटील आणि दरेकरांच्या चर्चेदरम्यान आला गृहमंत्र्यांचा कॉल, मग घडलं असं की...

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नौदल अधिकाऱ्यांना काल मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. परंतु त्यांना तत्काळ जामीन मिळाल्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. या आऱोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घेतला होता. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा राज्य सरकारवर निशाणा, वाचा सविस्तर

शुक्रवारी ही बातमी समोर आली तेव्हा, भाजपचे देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, अतुल भातखळकर तसेच अनेक मंडळींनी याप्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवला. आज याविरोधात प्रविण दरेकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या नौदल अधिकाऱ्याची मुलगीही आंदोलनात उपस्थित होती. मुंबईचे पोलिस सहउपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्याठिकाणी पोहचून आरोपींना योग्य त्या कलमांअंतर्गत कारवाई करण्याचं आश्वासन दिले. नांगरे पाटील आणि दरेकर यांच्यात चर्चा सुरू असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना कॉल आला. त्यांनीही आंदोलनकर्त्यांच्या मागणीची दखल घेतली.

काल  निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर भाजपच्या अतुल भातखळकरांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्यासंबधीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवले. परंतु पोलिसांनी जी कलमं आरोपींविरोधात लावणं अपेक्षित होतं ती त्यांनी लावली नाही. त्यामुळे योग्य ती कलमं न लावल्यास आंदोलन तीव्र करू अशी भूमिका प्रविण दरेकर यांनी मांडली.

उद्या रविवार! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर असा असेल मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईचे नवनियुक्त सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. आणि नौदल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी कलम 325 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली. मात्र हे कलम जामीनास पात्र असल्याने, आरोपींना जामीन मंजूर झाला. आंदोलकांकडून कलम 326 आणि 452 ही कलमं लावण्याची मागणी आहे. 326 कमल हे धारदार हत्यारांनी वार आणि 452 कलम घरात घुसून मारहाण यासाठी आहे. 452 हे कलम वाढवण्यात येईल” असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले

loading image
go to top