नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन

नवी मुंबईत भाजपचे नेते म्हणतायेत "आहीस्ता चलो रे'
नवी मुंबईत भाजपचे नेते म्हणतायेत "आहीस्ता चलो रे'

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मविआच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मागील 20 वर्षे पालिकेवर नाईकांची असणारी निर्विवाद सत्ता वाचवण्याकरिता भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्या दृष्टीने भाजपने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येऊ नये म्हणून भाजपकडून "आहीस्ता चलो रे'ची हाक देण्यात आल्याचे समजते. 

मोठी बातमी - शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..

महापालिका स्थापनेपासून गणेश नाईक यांची सर्वात जास्त काळ निर्विवाद सत्ता राहिली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झाल्यावरही नाईकांनी पालिकेवरील आपला अंकुश जाऊ दिला नाही. अगदी देशासहित राज्यात मोदी-लाट असतानाही नाईकांनी आपले वर्चस्व 2015च्या पालिका निवडणुकीत दाखवून दिले. तेव्हा नाईकांना शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा चांगला फायदा झाला. परंतु आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करून लढणार असल्याने पालिका निवडणुकीत नाईकांच्या बालेकिल्ल्यावर टाच आली आहे.

पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी तिन्ही पक्षांकडून स्थानिक पातळीवर रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे नाईकांविरोधात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उभे करून मविआने थेट आव्हान दिले आहे. नाईकांना नामोहरम करण्यासाठी मविआकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

25 वर्षांतील नाईकांची सत्ता उलथून टाकण्यासाठी मविआकडे हीच संधी आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी मोठी खेळी खेळण्याच्या ते विचारात आहेत. नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले नगरसेवक पुन्हा फोडून माघारी आणण्याची ही पहिली खेळी मविआकडून खेळली जाणार आहे.

तुर्भे स्टोअर्स, तुर्भे नाका, तुर्भे गाव, वाशी सेक्‍टर- 16, दिघा, ऐरोली, घणसोली व बेलापूर येथील नाईकांचे मनसबदार नगरसेवक फोडण्याचा पूर्ण प्रयत्न मविआने केला आहे. त्यामुळे नाईकांना आपल्या सोबत आलेल्या निष्ठावंतांना अखेरपर्यंत सोबत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

मनोमीलनाचा प्रयत्न 
आमदार गणेश नाईक हे कुटुंबासहित भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्यासोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील आजी-माजी नगरसेवकांसोबत पदाधिकारीही भाजपमध्ये आले; परंतु भाजपमधील जुन्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाईकांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना अद्याप स्वीकारलेले नाही. मागील अनेक वर्षांपासून भाजपचा झेंडा हाती घेऊन झगडत बसलेल्या जुन्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या नव्या मनसबदारांना निवडणुकीचे तिकीट देताना विरोध केला जात आहे. तिकीटवाटप करताना नाईकांना स्थानिक नगरसेवक व इच्छुक भाजपचा पदाधिकारी अशी दोन्हीकडील बाजू पडताळून पाहण्याचे काम करायचे असल्याने चर्चा करून वाद शमवण्याकरिता मनोमीलनाचा कार्यक्रम सुरू आहे. 

BJPs reputation in Navi Mumbai Municipal Corporation election is at stake

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com