

BJP leaders celebrating Mahesh Patil’s unopposed victory in Dombivli.
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भाजपाने बिनविरोध विजयांची ‘स्ट्रॅटेजिक’ मालिका सुरू केल्याचे चित्र दिसू लागले आहे. पॅनल क्रमांक 27 आणि 26 मधील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ भाजपाची ताकदच अधोरेखित झाली नसून, विरोधकांच्या माघारीमागील राजकीय गणितांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.