

Political Activity Rises in Vasai–Virar; BJP–Shiv Sena Meet for Poll Strategy, NCP Missing
Sakal
विरार : महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने साऱ्याच पक्षांनी त्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील शिंदे सेने आणि भाजप मध्ये काळ विरार पूर्व येथे सुदेश चौधरी ह्यांच्या कार्यालयात आगामी वसई-विरार महानगर पालिका निवडणूकांच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा करण्यात आली असली तरी या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षानी दांडी मारल्याने युती मध्ये काही बिनसल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे.