BMCच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेत खडाजंगी; परस्पर मत बाद केल्याचा महापौरांवर आरोप

समीर सुर्वे
Friday, 16 October 2020

मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप मुलूंड येथील एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप मुलूंड येथील एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना 10-10 मतं मिळालेली असतानाही महापौर किशोरी पेडेणकर यांनी परस्पर एक मत बाद करुन शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषीत केले. या विरोधात भाजपने आंदोलन केले असून न्यायालयातही दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरचीच्या मालमत्तांचा होणार लिलाव

मुंबई महानगर पालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून दीपमाला बढे आणि भाजपकडून जागृती पाटील रिंगणात होत्या.या प्रभागात दोन्ही पक्षाचे 10 नगरसेवक आहेत.समसमान मतं मिळाल्यास चिठ्ठी उडवून विजयी उमेदवार घोषीत केला जातो.मात्र,पिठासिन अधिकारी असलेल्या महापौरांनी भाजपचे एक मतं बाद ठरवून पाटील यांना बढे यांना 10 आणि पाटील यांना 9 मतं मिळाल्याचे जाहीर केले.या निर्णयाला आक्षेप घेत भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, खासदार नगरसेवक मनोज कोटक यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी हरकत घेत बाद झालेले मत कोणाचे होते असा प्रश्‍न उपस्थीत केला.त्यावर महापौरांनी बाद झालेले मतं जाहीर केले नाही.यावरुन भाजपच्या नगरसेवकांनी काही काळ महापालिका मुख्यालयातच निवडणुक कक्षा बाहेर आंदोलन केले.सोमवारी पुन्हा आंदोलन करण्यात येणार असून वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागू असे गटनेते शिंदे यांनी सांगितले.

कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.सदस्यांनी मतपत्रिकेवर ठरवुन दिलेल्या रकान्यात स्वाक्षरी करणे गरजेचे आहे.नियम पाळले गेले नाहीत तर मतं बाद होतं.असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPShiv Sena controversy in BMCs ward committee elections

टॉपिकस