कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

समीर सुर्वे
Friday, 16 October 2020

मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे

मुंबई -: मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या सर्व 227 जागा लढण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी; ठाकरे सरकारचा महिलांना दिलासा

महाराष्ट्राचे प्रभारी पाटील यांनी बुधवारी मुंबईतील कॉंग्रेसचे माजी खासदार,मंत्री,आमदार तसेच जिल्हा अध्यक्षांची बैठक घेतली.या बैठकीत मुंबई कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नव्या अध्यक्षांची नियुक्ती अशी मागणी करण्यात आली आहे.एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड मंत्री असल्याने एकाच घरात दोन पदे दिली जाऊ नये.तसेच,एकनाथ गायकवाड यांचे वय जास्त असल्याचे कारणही पुढे करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेची 2022 ची निवडणुक पक्षाने स्वतंत्र लढवावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली आहे.सध्याच्या महाविकास आघाडीत निवडणुक लढवल्यास त्याचा पक्षाच्या व्होट बॅंकवर परीणाम होईल.तसेच,कमी जागा लढल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परीणाम होईल.त्यामुळे सर्वच्या सर्व जागा लढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

सरकार इलेक्ट्रॉनिक मिडियावर अंकुश का ठेवत नाही; उच्च न्यायालयाचा सवाल

एच.के.पाटील यांनी माजी खासदार प्रिया दत्त,हुसेन दलवाई,भालचंद्र मुणगेकर,माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे,बाब सिध्दीकी, सुरेश शेट्टी,आरिफ नसिम खान तसेच विद्यमान मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख तसेच आमदार भाई जगताप,अमिन पटेल झिशान सिध्दीकी, माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर, यांच्याशी चर्चा केली.तसेच,पक्षाच्या मुंबईतील सहा जिल्हा अध्यक्षांचीही भेट घेऊन त्यांची मतं जाणून घेतली आहेत. पाटील त्यांचा अहवाल दिल्लीती पक्षातील वरीष्ट नेत्यांकडे सुपूर्द करणार आहेत.

 

कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी स्पर्धा
-डॉ.अमरजितसिंह मनहास ,आमदार भाई जगताप,माजी राज्यमंत्री आरिफ नसिम खान,सुरेश शेट्टी

 

महापालिका निवडणुकीतील कॉंग्रेसचे यश

  • -2002-56जागा (मुंबई अध्यक्ष दिवंगत मंत्री मुरली देवरा )
  • -2007- 77 जागा (मुंबई अध्यक्ष दिवंगत राज्यमंत्री गुरुदास कामत)
  • -2012-52 जागा (मुंबई अध्यक्ष माजी आमदार कृपाशंकर सिंह )
  • -2017- 32 जागा (मुंबई अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम )

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Congress fight the upcoming BMC elections independently?