रक्ताचा कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

रक्ताचा कर्करोग हा प्रामुख्याने अस्थिमज्जा, रक्त आणि लसिका प्रणाली (लिम्फाटिक सिस्टीम) यामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास होण्याची शक्‍यता असते. रक्ताच्या कर्करोगाचे तीन उपप्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा. त्यापैकी ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा असून तो रक्त आणि अस्थिमज्जेत आढळून येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरिरात पांढऱ्या रक्तपेशींची मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तांबड्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्‌सच्या निर्मितीवर त्याचा परिणाम होतो. लिम्फोमा हा लसिका उतींमध्ये (लिम्फॅटिक सिस्टीम); तर मायलोमा हा रक्तातील प्लाझ्माशी संबंधित कर्करोग आहे.

कारणे -
रक्ताचा कर्करोग नेमका कशामुळे होतो, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही; मात्र काही घटकांमुळे तो होण्याची शक्‍यता जास्त असते.

वय - रक्ताचा कर्करोग सहसा ज्येष्ठ नागरिकांमध्ये; तर ल्युकेमिया हा लहान मुलांमध्ये आढळतो.

कौटुंबिक पार्श्‍वभूमी - कुटुंबात कर्करोगाची पार्श्‍वभूमी असल्यास हा कर्करोग होऊ शकतो.

अत्यल्प रोगप्रतिकारक शक्ती - कोणताही आजार होण्याचे पहिले कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.

संसर्ग - रक्ताशी संबंधित आजार असलेल्या रुग्णाशी संसर्ग झाल्यास हा आजार होण्याची शक्‍यता असते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood cancer

Tags
टॉपिकस
Topic Tags: