esakal | राज्यातील रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा - डॉ. राजेंद्र शिंगणे
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Rajendra Shingane

राज्यातील रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा - डॉ. राजेंद्र शिंगणे

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  राज्यातील रक्तदात्यांनी (Blood Donators) स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी केले आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील (Government Agency) सर्व घटक, जिल्हाधिकारी (Collector) , मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हील सर्जन (Civil Surgen) यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन (Rules) करुन रक्तदान शिबिरे (Blood Donation Camp) आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. (Blood Donators come for Blood donations government agencies too says dr Rajendra Shingane-nss91)

रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून प्रयत्नशील

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी रक्ताची नियमित गरज भासते. यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धतेसाठी कार्यआराखडा तयार करावा, असे निर्देशही डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी रक्तपेढयांना केले आहे.

हेही वाचा: तिकीटावरून सापडला खूनी; ३६ तासात वसई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा मुंबईत आणि राज्यात पाच ते सहा दिवसांचा रक्तसाठा असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व सामाजिक, धर्मादाय व राजकीय संस्थांना विनंती करण्यात येते की, त्यांनी संपूर्ण राज्यात रक्तपेढ्यांच्या गरजेनुसार छोटे छोटे रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, त्याचप्रमाणे सर्व नियमीत रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे.. जेणेकरून राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

loading image