esakal | दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन | Blood donation
sakal

बोलून बातमी शोधा

Blood Donation

दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : राज्यात रक्ताचा तुटवडा (blood shortage) जाणवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दागिना बाजार, झवेरी बाजार (Zaveri bazaar) येथील बंगाली भाषकांनी केलेल्या रक्तदानामुळे (bllod donation) गोकुलदास तेजपाल या शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी ३११ युनिट रक्त संकलित झाले. पश्चिम बंगाल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीत दत्ता (Ranjit dutta) यांनी आपल्या सदस्यांच्या सहकार्याने रविवारी (ता.३) मुंबादेवी येथे दागिना बाजार सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

हेही वाचा: इमारतीतील छत कोसळून दोन जखमी; माटुंगा लेबर कॅम्पमधील घटना

दागिना बाजार, झवेरी बाजार येथील सोन्याचे काम करणारे तरुण कारागीर, मदतनीस, व्यापारी यांनी रक्तदान करीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. नगरसेवक जावेद जुनेजा, आफ्रीन शेख, उमर लकडावाला यांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले. गोकुलदास तेजपाल रुग्णालयाचे डॉ. शिवाजी पवार यांच्यासह वैद्यकीय पथकाने रक्त संकलन केले. डॉ. पवार यांनी तरुण-तरुणी, कॉलेज विद्यार्थी, क्रीडापटू आणि व्यावसायिक यांनी रक्तदान करून कोविड काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत करावी, असे आवाहन केले. मुंबई हीच आमची कर्मभूमी आहे, आम्ही पश्चिम बंगाली भाषक असलो तरी मुंबई आमची दुसरी आई आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून जनतेची सेवा करतो, असे रंजीत दत्ता म्हणाले.

loading image
go to top