esakal | २४ तासात भाजपाने शिवसेनेला दिला झटका, सेनेचे नगरसेवक फोडले
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray

२४ तासात भाजपाने शिवसेनेला दिला झटका, सेनेचे नगरसेवक फोडले

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: भाजपाच्या सहा नगरसेवकांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. या घटनेला २४ तास उलटण्याच्या आतच भाजपाने (bjp) शिवसेनेला दणका दिला आहे. जळगाव मुक्ताईनगर महापालिकेतील भाजपाचे सहा नगरसेवक काल शिवसेनेने फोडले. त्यानंतर आज भाजपाने माथेरानमधील (Matheran) शिवसेनेचे दहा नगरसेवक फोडले. (Blow to Shiv Sena 10 corporators from Matheran join BJP)

माथेरानमधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माथेरान प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून हा भाग ठाणे जिल्ह्यात येतो. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार नेते आहेत. त्यांची या भागावर बऱ्यापैकी पकड आहे. त्यामुळे दहा नगरसेवकांनी फुटून भाजपात प्रवेश करणे, हा शिवसेनेसाठी मोठा झटका आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील विसंवादाचा स्फोट होईल'

माथेरान नगरपालिके १४ नगरसेवक आहेत. हे सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यातल्या १० जणांनी शिवबंधन मोडून भाजपात प्रवेश केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यामुळे आता माथेरान नगरपालिकेत भाजपाचे बहुमत झाले आहे. शिवसेनेच्या या नगरसेवकांना भाजपामध्ये आणण्यात भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.