esakal | 'ठाकरे सरकारमधील विसंवादाचा स्फोट होईल'
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas-Aghadi-Ministers

'ठाकरे सरकारमधील विसंवादाचा स्फोट होईल'

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई: वर्षा निवासस्थानी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्याच मुद्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. (soon diffrences in thackeray govt will create problem pravin darekar )

"शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट झाली. यावेळी बैठकीत दोघांमध्ये कुठल्या विषयांवर चर्चा झाली, ते दोघांनाच माहित आहे. जी माहिती समोर येतेय, ते खरं असेल, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली असेल, तर पवारसाहेब त्या मंत्र्यांची बैठक बोलवून माहिती घेतील. एकदंर या सर्व प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चाललय, ते दिसून येतं. येणाऱ्या काळात या विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही" असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: कल्याणमध्ये आलिशान 'रॉल्स रॉयस'ची जोरदार चर्चा

संजय राऊत काय म्हणाले?

या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारलं. त्यावर राऊत यांनी, "नाराजीबद्दल तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका ?" असं सांगितलं.

"अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण ,पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत" असे राऊत म्हणाले.