esakal | भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी २४ भुखंडाचे हस्तांतर | BMC
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC: भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी २४ भुखंडाचे हस्तांतर

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा (bhendi bazaar redevelopment) मार्ग मोकळा करण्यासाठी महानगरपालिकेने (bmc) 24 भुखंडाचे हस्तांतर (land handover) करण्याचा निर्णय घेतला आहे. या भुखंडाच्या मोबदल्यात दुसऱ्या भुखंडासह फरकाचे 21 कोटी रुपयेही महानगरपालिकेला देण्यात येणार आहे.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील पहिला समुह विकास(क्‍लस्टर डेव्हलपेमेंट)म्हणून भेंडी बाजार पुनर्विकासाचा ओळख आहे.या पुनर्विकासाच्या क्षेत्रात महानगर पालिकेचे 24 भुखंड होते.त्यामुळे पुनर्विकासात अडथळे होते.गेल्या सात वर्षांपासून यावर तोडगा न निघाल्याने पुनर्विकासाच्या कामावर मर्यादा आल्या होत्या.विकासकाने या भुखंडाच्या बदल्यात महानगर पालिकेने 1 किलोमिटरच्या परीसरात पर्यायी भुखंड उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव दिला होता.तसेच किंमतीच्या फरकाची रक्कम देण्याची तयारीही दाखवली होती.

प्रशासकीय मंजूरी नंतर हे भुखंड हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.या प्रस्तावाला बुधवारी सुधार समितीत मंजूरी देण्यात आली असल्याचे समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले.पालिका हस्तांतरीत करत असलेले भुखंड आकाराने लहान होते.त्यामुळे त्यांच्या पुनर्विकासातही अडथळे होते.आता पर्यायी दोन ठिकाणी 24 भुखंडाच्या क्षेत्रफळा एवढी जागा मिळणार असल्याने त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्‍नही मार्गी लागेल असेही परब यांनी सांगितले.तसेच,भेंडी बाजार पुनर्विकासातील अडथळेही दुर होती.असेही नमुद केले.

भुलेश्‍वर मांडवीत जागा

महानगर पालिकेला मांडवी येथील बाबुला टॅंक रोड जवळ 4 हजार 97 चौरस मिटरचा एक आणि भुलेश्‍वर येथे मौलाना आझाद मार्गावर 447 चौरस मिटरची जागा मिळणार आहे.हे पुर्वीच्या भुखंडापेक्षा आकाराने मोठे असल्याने त्यांच्या पुनर्विकास करुन पालिकेला उत्पन्न मिळणार आहे.असा दावाही करण्यात येत आहे.महानगर पालिकेचे 422 भाडेकरु असून त्ययात 103 अनिवासी भाडेकरु आहेत.

loading image
go to top