esakal | मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण | corona
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालयातील (KEM Hospital Mumbai) 29 विद्यार्थ्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग (coronavirus) झाला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. यात 23 एमबीबीएसच्या (mbbs) दुसऱ्या वर्गातील तर 6 जण पहिल्या वर्गातील वेगवेगळ्या हॉस्टेल तसेच घरी राहणारे विद्यार्थी आहेत.

रुग्णालयात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्या आणि ट्रेसिंगमुळे ही बाब समोर आली आहे. केईएम रुग्णालयात 5 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, त्यात डाॅक्टर्स, नर्स, प्राध्यापक, निवासी डॉक्टर्स चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतानाही लागण

केईएम रुग्णालयात एका विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयातील इतर विद्यार्थ्यांना चाचणी केली गेली.  या चाचण्यांमध्ये एकूण 29 विद्यार्थी पाॅझिटिव्ह आलेत. या विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षण असून काही विद्यार्थ्यांना लक्षणही नाहीत असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

हजारातून फक्त 29 विद्यार्थ्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग -

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकालाच लस देण्यात येत आहे. दोन्ही डोस घेतलेले नागरिकही पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह येत आहेत. मात्र, त्याच्यांत गंभीर होण्याचे प्रमाण आणि मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. दोन्ही डोस घेऊनही 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील केईएम रुग्णालयात 29 विद्यार्थी ए सिम्प्टोमॅटिक आढळले. मात्र, त्या सोबत 1 हजार विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतर 29 विद्यार्थी आढळले असल्याचे ही सांगण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु

दरम्यान कोरोना लस देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते. आता दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. अशावेळी दोनही लसीचे डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु आहे. मात्र, अशा तपासणीत एखादा पॉझिटीव्ह आढळल्या नंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाते. त्याप्रमाणे केईएम रुग्णालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: मुंबईतल्या शाळा ‘एक दिवसाआड’ सुरु होणार - महापौर पेडणेकर

ब्रेक थ्रू इन्फेक्शन

यावर बोलताना अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, एका बॅचमध्ये 250 विद्या दोन बॅच म्हणजे 500 विद्यार्थी. शिवाय, पहिल्या व दुसऱ्या वर्षातील एमबीबीएस वर्गातील प्रत्येकी 180 विद्यार्थी आणि इंटर्न बॅच मिळून 1100 डॉक्टर तपासले. 1100 विद्यार्थ्यांमागे 29 डॉक्टर ए सिम्प्टोमॅटिक आढळले.  याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हटले जाते. यात 23 एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गातील तर 6 जण पहिल्या वर्गातील वेगवेगळ्या हॉस्टेल तसेच घरी राहणारे असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. या सर्वांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.

हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक

मुंबईतील केईएम रुग्णालय (KEM Hospital Mumbai) आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज (Seth G S Medical College)मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (MBBS students covid positive) झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा, मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.

loading image
go to top