उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक; शिवसेनेनेही फुंकलं २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग

उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक; शिवसेनेनेही फुंकलं २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग

मुंबई : एकीकडे भाजपने मुंबई महापालिकेवर २०२२ मध्ये भाजपचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. तर आता दुरीकडे शिवसेने देखील २०२२ मुंबई मनपा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केलीये. त्यामुळे २०२२ ची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु केलीये.  

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये मुंबईत शिवसैनिकांकडून केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेतला गेला. या बैठकीतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना आगामी २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मतदारसंघनिहाय आणि स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर होते.    

या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणालेत की, अधिक जोमाने कामाला लागा, आपण कुठे कमी पडलो हे देखील पहा. विरोधक काय बोलतायत याकडे लक्ष देऊ नका आणि जोमाने कामाला लागा. आपण विरोधकांचा समाचार घेण्यास सक्षम आहोत", असं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. 

त्यामुळे एकीकडे दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत रणशिंग फुंकलंय, तर आता शिवसेनेकडूनही मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं गेलंय.

BMC 2022 election uddhav thackeray conducts special meeting of shivsena party workers at varsha 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com