पिचकारी बहाद्दरांवरही पालिकेचा कारवाईचा दंडुका; 14 दिवसांत दीड लाखाची दंड वसुली

समीर सुर्वे
Saturday, 3 October 2020

पालिकेने 852 पिचकारी बहाद्दरांकडून प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे 1 लाख 46 हजार दंड वसूल केला आहे.

मुंबई: मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच महापालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही कारवाई सुरू केली आहे. मागील 14 दिवसांत (18 सप्टेंबरपासून) पालिकेने 852 पिचकारी बहाद्दरांकडून प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे 1 लाख 46 हजार दंड वसूल केला आहे. घाटकोपर परिसरातून सर्वाधिक 232 जणांकडून 40 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे; तर मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपयांची दंड वसुली केली जात आहे. याद्वारे पालिकेने आतापर्यंत तब्बल 60 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

कामात दिरंगाई खपवून नाही घेणार; आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला दमवजा सूचना

राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. सुरुवातीला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात होता. एवढी मोठी रक्कम सामान्य माणसाकडे नसल्याने समज देऊन सोडले जात होते. मात्र सप्टेंबरपासून पालिकेने 200 रुपयांचा दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच कारवाईही अधिक वाढवली असून, एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 18 हजार 118 जणांवर कारवाई करून 60 लाख 4 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

मुंबईत कोरोनाबाधितांची वाढ थांबेना; गेल्या 24 तासात 2440 नवे रुग्ण; तर 42 जणांचा मृत्यू

सर्वाधिक दंडवसुली झालेला परिसर 
विभाग कारवाई केलेले नागरिक दंड वसुली 
घाटकोपर
(एन प्रभाग) 232 40,000 
कुर्ला (एल प्रभाग) 145 17,900 
गोरेगाव (पी दक्षिण प्रभाग) 130 26,000 

 

BMC action against  Spitting person

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC action against Spitting person