

BMC
Esakal
मुंबई : पावसाळा तोंडावर येत असताना महापालिका प्रशासनाने झाडांच्या फांद्या छाटणीसाठी कंबर कसली आहे. आपल्या परिसरातील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल सात हजार ९७८ खासगी व शासकीय आस्थापनांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये विशेषतः बोरिवली (आर सेंट्रल) आणि अंधेरी पश्चिम (के साऊथ) या विभागांत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.