esakal | मुंबईतील क्षयरोग हद्दपार करण्यासाठी महानगरपालिकेचा करार | BMC
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis

मुंबईतील क्षयरोग हद्दपार करण्यासाठी महानगरपालिकेचा करार

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

मुंबई : कोविड-१९ (Corona) चा वेगाने संसर्ग सुरू असताना मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेत खासगी-सार्वजनिक सहभागातून करण्यात आलेली कामगिरी महत्त्वाची ठरली होती. हे लक्षात घेऊन २०२५ पर्यंत मुंबईतून क्षयरोगाचे (Tuberculosis) निर्मूलन करण्यासाठी खासगी रुग्णालयांसह (private hospitals) भागीदारी करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी (Suresh kakani) यांनी दिली.

हेही वाचा: अंबरनाथ : पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

कोविड नियंत्रण व्यवस्थापनात जी ४३ खासगी रुग्णालये महापालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन २०२५ करता सहभागी करून घेण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती देताना सांगितले, की मुंबईतील ५० टक्के क्षयरोग रुग्णसंख्या खासगी क्षेत्रातून येत असल्याने खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलनात आपापल्या क्षमतेने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालय, युनिसन मेडिकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के. जे. सोमय्या रुग्णालय, सर्वोदय रुग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबवण्यात येत आहेत.

दोन औषधे उपलब्ध

मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिती टिपरे म्हणाल्या, की राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रुग्णांकरिता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी रुग्णालयांनी करार केल्यास विकेंद्रीकरण करण्याबाबत मदत होईल आणि क्षयरुग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील.

loading image
go to top