BMC: "माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, सर्वांची चौकशी होणार ओक्के"; शेलारांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashish shelar

BMC: "माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, सर्वांची चौकशी होणार ओक्के"; शेलारांचा इशारा

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. त्यामुळं या घोटाळ्यांची कॅग मार्फत चौकशी होणार आहे, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. पण हे घोटाळे नक्की किती आणि कसे झाले याची सविस्तर माहिती शेलार यांनी दिली. (BMC all contract during corona period will be investigated Ashish Shelar warned)

हेही वाचा: प्रकल्प गुजरातलाच का? राज ठाकरेंच्या प्रश्नाला शेलारांचं उत्तर; म्हणाले, परिपक्व राजकारणी...

शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंतच्या काळात जी कंत्राटं दिली गेली त्यांच्या चौकशा होणार आहेत. कॅगच्या या चौकशीचं आम्ही स्वागत करतो. या काळात दहा वेगवेगळ्या विभागात १२,०१३ कोटी रुपायंची जी कंत्राटी दिली गेली, त्यासंबंधी कॅगकडे सरकारनं तक्रार दिली आहे.

हेही वाचा: Morbi Bridge Collapse: पूल दुर्घटनेला व्यवस्थापनातील लोक जबाबदार? पोलीस म्हणतात...

1) कोरोना काळात ३,५३८ कोटी रुपायांची खरेदी झाली, याची कॅग चौकशी करणार आहे.

2) जनतेच्या गरजेनुसार घेतलेल्या भूखंड प्रकरणी अजमेरा बिल्डरला ३,०३९ कोटी रुपये मुंबई महापालिकेनं दिले. बिल्डरनं तो भूखंड फक्त अडीच कोटी रुपयांना विकला. या भूखंडाच्या श्रीखंडाची चौकशी होणार.

३) याच काळात चार पुलांची बांधकामं झाली. यासाठी १,४९६ कोटी रुपये खर्च आला. कोरोना काळात विविध रुग्णालयात ९०४ कोटी रुग्णालयातील उपकरणांसाठी खरेदी केली. जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांची खरेदी झाली यामध्ये बोगस कंत्राटदार होता.

४) पावसाळ्याच्या काळात रस्ते, खड्डे दुरुस्ती यांसाठी ५६ रस्त्यांची दुरुस्ती केली. त्यावर २,२८० कोटी रुपये खर्च झाला. तरीही मुंबईकरांच्या गाड्या खड्ड्यात गेल्या, त्याची चौकशी होणार आहे.

५) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरुच झाले नाहीत पण त्यासाठी १,०४९ कोटी खर्च झाले. तीन मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांसाठी १,१८६ कोटी रुपये खर्च झाले. घनकचरा व्यवस्थापनात अजूनही देवनार प्रकल्प सुरु झालेला नाही. यामध्ये १,०२४ कोटी रुपये खर्च झाले. या सर्व प्रकरणांच्या चौकशा होणार आहेत.

चौकशीच्या पार्श्वभूमीवर मृत्यू होणं दुर्देवी

कोणाचाही मृत्यू दुर्देवी आहे, त्यामुळं यावर असंवेदनशील विधान आम्ही करुच शकत नाही. पण या सगळ्याच्या आड चौकशीच्या फेऱ्यातून मला सोडवा अशा पद्धतीची संहिता कायद्यात प्रविष्ट नाहीत, अशा शब्दांत शेलार यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सल्ला दिला आहे.

पंतप्रधानांचा सर्वांना समान न्याय

पंतप्रधान सर्वांना समान न्याय देतात. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला स्वप्न अनेक जणांनी दाखवलं पण रेल्वेची जमीन पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाली. एअर इंडियाची बिल्डिंग शासनाला मिळणार आहे, हे मोदींच्या मार्फत झालंय. मुंबई मेट्रो, बुलेटट्रेन याचा निधी आणि संमती मोदींकडून आली आहे, असंही शेलार यावेळी म्हणाले.