'BMC ने आमचा विश्वासघात केला', निवासी डॉक्टर्सनी आज हाती घेतले फलक, उद्या...

रेसिडंट डॉक्टर्सचा समावेश कोरोना योद्ध्यांमध्ये होतो, पण...
डॉक्टर आंदोलन
डॉक्टर आंदोलन

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी अजूनही आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. मुंबई महापालिका (BMC) रुग्णालयातील रेसिडंट डॉक्टर्स (Resident doctors) कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतायत. रेसिडंट डॉक्टर्सचा समावेश कोरोना योद्ध्यांमध्ये होतो. पण असं असूनही, या रेसिडंट डॉक्टर्सना त्यांची देणी मिळालेली नाहीत. ही थकलेली देणी मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. (BMC betrayed us Resident doctors launch campaign to protest)

प्रशासन थकवलेली स्टायपेडची ही रक्कम देत नसल्याबद्दल या रेसिडंट डॉक्टर्सनी निषेध मोहिम सुरु केलीय. "ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी फलक हाती घेऊन निषेध नोंदवलाय. महापालिकेने आमचा विश्वासघात केला. आमच्याबरोबर विश्वासघात झाला, तरी आम्ही काम करतोय" अशा मजकुराचे फलक हाती घेऊन डॉक्टरांनी निषेध नोंदवला. सायन, नायर, केईएम हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर्स काम करतात.

डॉक्टर आंदोलन
लसीकरण: सरकारी की खासगी? पाहा मुंबईकरांची पसंती कशाला...

ऑगस्ट २०२० मध्ये मंत्रिमंडळाने सरकारी रुग्णालयातील रेसिडंट डॉक्टरांचे महिन्याचे स्टायपेड १० हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १० मे पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान मुंबईत सोमवारी ३,०५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. ६९ रुग्णांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com