esakal | देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका मोडणार 5 हजार कोटींच्या ठेवी
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका मोडणार 5 हजार कोटींच्या ठेवी

कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलंय. बृहन्मुंबई महानगरपालिका आर्थिक संकटात 

देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका मोडणार 5 हजार कोटींच्या ठेवी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.19 : लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसलाय. कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलंय. लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न त्यातच आरोग्य विभागावर वाढलेला खर्च यामुळे मुंबई महापालिका आता बँकेतील ठेवी मोडणार आहे. तब्बल 5 हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या जाण्याची शक्यता आहे.

२०२० फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना व्हायरस कोविड 19 च्या उपचारांसाठी 1 हजार कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. तर लॉकडाऊनमुळे महानगरपालिकेच्या महसूलात देकील 41 टक्क्यांची घट झाली आहे. पहिल्या पाच आर्थिक महिन्यात 8 हजार 320 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात केवळ 4 हजार 905 कोटी रुपये उत्पन्न झालं आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कधीपर्यंत पुर्वपदावर येईल याचा काहीही नेम नसल्याने उत्पन्नचा तोटा भरुन निघणे अवघड आहे. त्यामुळे आता बृहन्मुबई महानगर पालिकेने आता बँकेतील ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड

मुंबई महापालिकेच्या 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातील 5 हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. मात्र, या ठेवी मोडण्यासाठी प्रशासनाला महासभेची परवानगी घ्यावी लागेल.

बांधकाम शुल्क आणि मालमत्ता करातील उत्पन्नात आतापर्यंत 80 टक्क्यांची घट झाली आहे. तर आतापर्यंत प्रकल्पांच्या खर्चात 2500 कोटीची कपात करण्यात आली असून प्रत्येक विभागाला 20 टक्के बचत करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

BMC is broke amid corona virus pandemic planning to liquidate bank FDs

loading image
go to top