esakal | मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड
sakal

बोलून बातमी शोधा

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड

...तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला - आशिष शेलार 

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 19 : केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी आणि पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली. तेव्हा क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. तेंव्हा जे ओरडत होते त्यांनी क्वीन्स नेकलेसच आता तोडला, त्याचं काय? असा सवाल करत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्त्वाची बातमी - लोकल ट्रेन्स आणि ST बसच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे आमनेसामने, परबांच्या उत्तरावर देशपांडेंचा प्रतिसवाल


महत्त्वाची बातमी - कंगनाची दोन कोटींची भरपाईची मागणी बोगस, महापालिकेने दाखल केलं प्रतिज्ञापत्र 

आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक LED दिवे मुंबईत लावले गेले. तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण आता क्वीन्स नेकलेसची माळ हे तोडून टाकत आहेत, क्वीन्स नेकलेसच राहणार नाही, त्याचे काय?  असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आता पारसी गेट तोडला. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा खाण्याचा डाव दिसतोय. यामुळे परिसराची शोभा जाणार आहे. आता हे तुम्ही करताय ते पुण्य आणि आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप होते का? असा सवाल विचारत हा दुटप्पीपणा असून यामुळे मुंबईचे बेगडी प्रेम उघड झाल्याचे आशिष शेलार म्हणाले. मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

BJP mla ashish shelar targets shiv sena over coastal road project

loading image
go to top