BMC Budget: शाळांचे डिजीटलायझेशन, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य

समीर सुर्वे
Wednesday, 3 February 2021

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात  शाळांचे डिजीटलायझेशनवर भर देण्यात आला असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासाला चालना देण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सुपूर्द केला. या अर्थसंकल्पात पालिकेच्या शिक्षण विभागासाठी 2 हजार 945 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात शाळांचे डिजीटलायझेशनवर भर देण्यात आला असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासाला चालना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

कोविड काळात्र ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखीत झाले असून पालिकेने 40 युट्यूब चॅनल्स सुरु केले आहेत. त्याचबरोबर विविध समाजमाध्यमे आणि मॅसेजवरुन शिक्षण सुरु आहे. अशा पध्दतीचे शिक्षण पुढेही सुरु राहाणार आहे. त्याच बरोबर 1300 वर्ग खोल्यांमध्ये डिजीटल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. यात डिजीटल फळ्यांसह इतर सुविधाही करण्यात येणार आहे. यासाठी 28 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाषा प्रयोगशाळाही ऑनलाइन सुरु करण्यात आली. 25 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर जीके क्लास ॲप उपमाध्यमातून ही प्रयोगशाळा सुरु करण्यात आले असून त्या अंतर्गत 210 विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य शिकवले जात आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मुंबई महापालिकेच्या शिक्षण बजेटमध्ये नाविन्याचा अभाव
  • केवळ नव्या सीबीएसई शाळांसाठी केलेली तरतुद नवी
  • विशेष नवे प्रकल्प आणि योजनांऐवजी महापालिका शाळांचं  नवं नामकरण आणि लोगो बदलण्यावरच भर
  • महापालिका शाळेतील १३०० वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम अंतिम टप्प्यात.
  • तरतुद २८.५८ कोटी
  • मुंबई महापालिकेच्या शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल नावाने नव्या लोगोसह ओळखल्या जाणार. ९६३ प्राथमिक आणि २२४ माध्यमिक शाळा पालिकेच्या आहेत. 
  • नव्या २४ माध्यमिक शाळा यंदा सुरू केल्या जाणार
  • कोविड काळात शाळा सुरू करताना मुलांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सॅनिटायझर, मास्कसाठी १५.९० कोटींची तरतूद.
  • सीबीएसई बोर्डाच्या १० नवीन शाळा सुरू करणार. याकरता २ कोटी रूपयांची तरतूद केलीय. शहरात २, पश्चिम उपनगरात ३ आणि पूर्व उपनगरात ५ शाळा असतील.

----------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC Budget 2021 22 Digitization schools priority


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Budget 2021 22 Digitization schools priority