esakal | दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

 corona vaccination

दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : दक्षिण मुंबईतील ( south Mumbai D ward) डी वॉर्ड मध्ये कोविड रुग्णसंख्येत (corona patients) काहीशी वाढ झाल्याने बाधित लोकांचे लसीकरण (corona vaccination) झाले किंवा नाही याची तपासणी पालिका करणार आहे. नवीन बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे हाय रिस्क कॉन्टॅक्ट (high risk contact) असल्याचे समोर आले आहे. ( BMC checks vaccination details because highly corona infection in south mumbai-nss91)

डी वॉर्डमध्ये ब्रिज कॅण्डी,पेडर रोड,नेपीएनसी रोड,ग्रांट रोड,ताडदेव आणि गिरगाव चा काही परिसर येतो. पूर्वी 14 ते 15 रुग्ण सापडत होते मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही संख्या वाढून 24 ते 28 पर्यंत गेली असल्याचे विभाग अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.लोकांच्या चाचण्यांवर भर देण्यात आला असून बहुतांश लोकं बंधितांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत असे ही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शिक्षक परिषदेचा 'या' कार्यालयाला 'टाळे ठोका' आंदोलनाचा इशारा

लसीकरण अधिक वाढवण्यात येणार असुन त्यानंतर लसीकरण झालेले किती लोक पुन्हा बाधित होतात याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनाही सांगितले. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 250 पर्यंत वाढली आहे. परफेडही प्रवास हे देखील बाधित रुग्ण वाढण्याचे एक कारण असून त्यातील अनेक लोकांनी कामानिमित्त चाचणी केल्या नंतर हे समोर आले.

याबाबत बोलतांना ब्रिज कॅण्डी रुग्णालयाच्या अधिकारी नंदिनी छाब्रिया यांनी सांगितले की, बाधित रुग्णांपैकी अनेक रुग्णांचे लसीकरण झाले नव्हते तर काही लोकांनी पहिला डोस घेतला होता. अनेक लोक कोविड नियमांचे पालन करत नसल्याचे ही त्या म्हणाल्या. अत्यावश्यक सेवांसह इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यावर ही पालिकेने भर देणे गरजेचे असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या. तर दुकानदारांना आपल्या दुकानातील लसीकरणाची सद्यस्थिती दर्शवणारा फलक लावणे ही बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले. लोकांनी स्वतःची जबाबदारी स्वता घेणे आवश्यक असून आवश्यकतेनुसार विलगीकरण करायला हवे असे नेपीएनसी रोड सिटीझन फोरम चे मुकुल मेहता म्हणाले.

loading image
go to top