

Mumbai Road Potholes
ESakal
मुंबई : पावसाळा सुरू होऊन महिनाभरही झालेला नाही, तोच मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. १० जूनपासून आतापर्यंत रस्त्यांवर तब्बल तीन हजार १५ खड्ड्यांची नोंद झाली असून, मुंबईकरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे 'खड्डेमुक्त मुंबई'चे दावे किती फोल आहेत, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.