esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : उद्याने, मैदानांची देखभालही कमी खर्चात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्ते दुरुस्तीसाठी (road repairing) ३० ते ४० टक्के कमी दराने काम करण्यास कंत्राटदार (contractor) तयार असताना आता उद्याने, मैदानांची देखभाल (Garden care) सरासरी ३७ टक्के कमी दराने (low rate) करण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंत्राटदार महापालिकेवर (bmc) मेहेरबान झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: राज्यावर भारनियमनाचे संकट गडद

महापालिकेने मुंबईतील उद्याने, मैदाने, वाहतूक बेटांच्या वार्षिक देखभालीसाठी निविदा मागवल्या होत्या. प्रत्येक प्रभागानुसार या निविदा मागवण्यात आल्या होत्या. वर्षाला संपूर्ण मुंबईतील देखभालीसाठी १०२ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले होते; मात्र प्रत्येक प्रभागातील कंत्राटदारांनी ३० ते ४० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास उद्याने, मैदानांची देखभाल पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ३७ टक्के कमी दराने होणार आहे. संपूर्ण मुंबईतील उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी ६३ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही; पण पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

वादात अडकणार

रस्तेदुरुस्तीच्या निविदा ३० ते ४० टक्के कमी दराने आल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती. या निविदांना विरोध होऊ लागल्यावर पालिकेने फेरनिविदा मागवल्या आहेत. त्यापाठोपाठ आता उद्याने, मैदानांच्या देखभालीच्या निविदाही ३७ टक्के कमी दराने आल्याने हे कामही वादात अडकण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

४१.१३ टक्के कमी दराने निविदा

पालिकेने याबाबत प्रत्येक प्रभागानुसार निविदा मागवल्या होत्या. यात के-पूर्व अंधेरी-जोगेश्‍वरी पूर्व भागातील उद्यान मैदानाच्या देखभालीसाठी सर्वांत कमी ४१.१३ टक्के कमी दराने, त्यानंतर पी-दक्षिण गोरेगाव, जी-उत्तर दादर, माहीम, धारावी प्रभागातील उद्यान मैदानाच्या निविदा ४०.५० टक्के कमी दराने सादर झाल्या आहेत; तर अंधेरी-जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम, चेंबूर एम पश्‍चिम आणि कांदिवली आर दक्षिण या प्रभागांसाठी ४०.१ टक्के कमी दराने निविदा सादर झाल्या आहेत.

loading image
go to top