मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या काय आहे सर्व प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सर्वच यंत्रणांवर मोठा ताण पडतोय. हाच ताण मुंबईतील स्मशानभूम्यांवर देखील पडताना पाहायला मिळतोय. अशात मुंबई महानगरपालिकेकडून आता एक महात्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईत अंत्यसंस्काराची जागा आणि वेळ आता ऑनलाईन मिळणार आहे.

याचसोबत कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरु आहेत याची देखील यामाध्यमातून माहिती मिळवणं आता शक्य  होणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच जूनअखेरपर्यंत मुंबईतील स्मशानभूम्यांसाठीची संगणकीय प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

मोठी बातमी - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 'का' आहेत खासदार सुनील तटकरे नाराज ? असं काय घडलं की...
 

मुंबई महापालिकेअंतर्गत एकूण ४६ पारंपरिक स्मशानभूम्या आहेत.

यातील काही स्म्शानभूमीवर विद्युतदाहिन्या आहेत.

मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या स्मशानभूम्यांमध्ये मिळून २३७ चितास्थानं आहेत.

११ ठिकाणी विद्युतदाहिन्या आहेत 

महापालिकेला या स्म्शानभूम्यांच्या माध्यमातून २४ तासात १ हजार ४८७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात.  

मोठी बातमी -  कॉग्रेसच्या नाराजीवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण, मंत्री राजेश टोपे म्हणतात...

मुंबईतील विविध स्मशानभूम्यांवरील ताण सध्या वाढलाय. मुंबईतील स्मशानभूम्यांमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह त्याचसोबत नॉन कोविड रुग्णांचे मृतदेह देखील येत असतात. अशात कोविड आणि नॉन कोविड रुग्णाचे मृतदेह आणि अंत्यविधीसाठी आलेले नातलग एकाच वेळी येऊ नये आणि कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेकडून डॅशबोर्ड देखील बनवण्यात येणार आहे.

या सोबतच १९१६ या टोल फ्री क्रमांकावर देखील याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या नंबरवर फोन करून कोणत्या स्मशानभूमीत जायचंय, किती वाजता जायचंय याबाबत माहिती घेऊ शकणार आहात. 

त्यामुळे आता मुंबईत नागरिकांना अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन मिळणार आहे.  

BMC is developing online software to check and give crematorium 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC is developing online software to check and give crematorium