
BMC - सेनेच्या पराभूत उमेदवार एक महिन्यासाठी झाल्या नगरसेवक
मुंबई - सध्या मुंबई महापालिकेत (BMC Election 2022) निवडणुकांची धुमशान सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसह इतर पक्षांनीही मोर्चेबांधणीची तयारी सुरु केली आहे. मनसे, शिवसेना, भाजप (BJP) यांच्यात खरी चुरस दिसणार आहे. दरम्यान, आता मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची संख्या ९६ वरून ९७ होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ही संख्या वाढणार आहे.
हेही वाचा: राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान प्रकरण भोवणार? महिला आयोग करणार कारवाई
महापालिकेतील भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमदेवराला नगरसेवक पद देण्याचे आदेश पालिका न्यायालयाने दिले आहेत. प्रभाग क्रमांक १५९ मधून २०१७ ला भाजपचे प्रकाश मोरे निवडून आले होते. तर शिवसेनेच्या (Shivsena) कोमल जामसांडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. दरम्यान प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसांडेकर यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीवर निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे.
सध्या मोरे यांच्या वकिलाने या आदेशाविरोधात वेळ मागून घेतली आहे. दरम्यान कोमल जामसांडेकर यांना नगरसेवक पदाचा कालावधी अवघ्या काही दिवसांसाठी मिळणार आहे. कारण ७ मार्चला सभागृहाचा कार्यकाळ संपणार असून पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे.
हेही वाचा: दिशा सलियन प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख
Web Title: Bmc Election 2022 Shivsena Corporators Increased From One Member
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..