

Mumbai BMC Election result
ESakal
भाग्यश्री भुवड
मुंबई : मुंबई महापालिका २०२६च्या निवडणुकीत महिलांनी निर्णायक भूमिका बजावून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. यंदाच्या निवडणुकीत २२७ पैकी तब्बल १३४ जागांवर महिला उमेदवारांनी विजय मिळवून ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळवले आहे. हे यश आरक्षित जागांपुरते मर्यादित नसून सर्वसाधारण गटातील २० पुरुष उमेदवारांना धूळ चारून पालिकेत महिलाराज सिद्ध केले आहे.