Mumbai News : प्रशासकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाची कोंडी

मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेतील शिवसेना पक्षाची कोंडी करण्याची एकही संधी सत्ताधारी सोडत नाहीत
bmc election shiv sena uddhav thackeray Officials replaced projects conceived by Aditya Thackeray were cancelled politics
bmc election shiv sena uddhav thackeray Officials replaced projects conceived by Aditya Thackeray were cancelled politicssakal

मुंबई - मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेतील शिवसेना पक्षाची कोंडी करण्याची एकही संधी सत्ताधारी सोडत नाहीत. पालिकेचा अर्थसंकल्प जाहिर झाल्यानंतर निधी वाटपाचा मुद्दा वादग्रस्त ठरला. ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले अधिकारी बदलले, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प रद्द केले. त्यामुळे सद्या ठाकरे गटाची पालिकेत अडथळ्यांची शर्यत सुरू असल्याची चर्चा पालिका पर्तूळात आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासंकल्पनेतील माहीम वांद्रे वॉकवे सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर तब्बल २०८ कोटी रूपयांचा हा प्रकल्प रद्द झाला आहे. दरम्यान काही मर्जीतील अधिका-यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाना झालेले निधीवाटप वादग्रस्त ठरले होते.

भाजपच्या प्रभागात तीन कोटी, तर इतर पक्षांच्या १५० प्रभागांत प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्या संदर्भात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांसमवेत पालिकेच्या प्रमुख लेखापालांची भेट घेवून याबाबत जाब विचारला होता.

पालिकेने २२७ प्रभागांमध्ये समान निधीचे वाटप न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. निधी ही आयुक्तांची वैयक्तीक बाब नाही त्यांना याबाबत उत्तर द्यावेच लागेल, असे मत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रशासकीय स्तरावर शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकाच्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी करण्यात येत असल्याने आदित्य ठाकरे अस्वस्थ आहेत. त्यांनी थेट आयुक्तांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आयुक्त काम करीत असल्याबद्दल त्यांनी जाहिरपणे खंतही व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची अडथळ्यांची शर्यत सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तूळात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com