महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे सोशल इंजिनिअरिंग; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena-bjp

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे सोशल इंजिनिअरिंग; वाचा सविस्तर

मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (bmc election) शिवसेना (shivsena) आणि भाजपने (bjp) सोशल इंजिनिअरिंग (social engineering) सुरु केले आहे. भाषिक आणि धार्मिक गटांची (religious opinion) मतं लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांना पक्षात बढती (promotion in shivsena) दिली जात आहे. शिवसेनेचे मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांना युवासेनेचे (yuvasena) सह सचिव केले. तर, कॉंग्रेस मधून भाजपात आलेले कृपाशंकर सिंह (krupashankar singh) यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे.

हेही वाचा: मराठा समाजाच्या आरक्षणावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

मुंबईत मराठी मतदारां बरोबरच उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावतात.शिवसेनेला मिळणाऱ्या मतांमध्ये 70 ते 80 टक्‍क्‍यांहून अधिक प्रमाण हे मराठी मतांचे असते.तर,गुजराती,मारवाडी हा भाजपचा पारंपारीक मतदार आहे.2014 पासून उत्तर भारतीय आणि तरुण मराठी मतदारांसह उच्चभ्रु मराठी मतदार भाजपकडे वळला आहे.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपला खणखणीत यश मिळत आहेत.मात्र,आता उत्तर भारतीय मतदारांची नव्याने मोळ बांधण्याच्या हालचाली भाजपने सुरु केल्या आहेत.तर,भाजपला महानगर पालिका निवडणुकीत रोखायचे तर मुस्लिम मतदार फायद्याचे ठरणार आहे.त्यासाठीही शिवसेनेकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

म्हणून सिंह उपाध्यक्ष

मुंबईत उत्तर भारतीयांची 20 लाखाच्या आसपास मत आहे.त्यातील एकगठ्ठा मतं भाजपला 2014 पासून मिळत आहे.मात्र,मतदारांच्या नाराजीचा विचार करता भाजपने उत्तर भारतीय मतांची नव्याने मोळ बांधण्यास सुरवात केली आहे. कृपाशंकर सिंह यांची उत्तर भारतीय मतदारांमध्ये चांगली पकड असल्याने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे.उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांची चांगली उठबस आहे.त्याचा फायदा आगामी पालिका निवडणुकीत मिळेल.या अपेक्षेने त्यांना हे पद दिले गेले असल्याचे शक्‍यता आहे.

मोहसीन शेख का ?

मुंबईत 16 लाखाहून अधिक मुस्लिम मतदार आहे.मराठी मतांचे मोठे प्रमाण शिवसेनेकडे आहे.मात्र,अंधेरी पश्‍चिम आणि मुलूंड मतदार संघात गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.उच्चभ्रु मराठी मतदार भाजपकडे वळला आहे.त्यामुळे शिवसेनेला आता नवी वोट बॅंक तयार करण्याची गरज आहे.मुस्लिम मतदार साधारणत: एकगठ्ठा मतदान करतो.मोहसीन शेख यांच्या पत्नी नादिया शेख या गोवंडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका आहेत.तसेच,मुस्लिम तरुणांना शिवसेनेकडे वळविण्यासाठी शेख यांचा फायदा होऊ शकतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वादात शेख यांची आक्रमक भुमिका पाहून त्यांना बढती दिली गेल्याची चर्चा आहे.मात्र,त्या मागे पालिका निवडणुक लक्ष असणार हे निश्‍चित आहे.

loading image
go to top