

Thackeray Brothers Challenges For BMC Election
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेले शिवसेना भवन प्रभाग क्रमांक १९२मध्ये येतो. शिवसेना ठाकरे गट-मनसे युतीत हा प्रभाग मनसेच्या वाट्याला गेला, तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवाजी पार्कचा प्रभाग क्रमांक १९१ हा ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे शिवसेना भवनाची शान अबाधित राखण्याची धुरा मनसेच्या खांद्यावर, तर शिवाजी पार्क राखण्याचे आव्हान ठाकरे गटाकडे असणार आहे.