पुजा ददलानी पुन्हा गैरहजर; तब्येतीचं कारण देऊन चौकशी टाळली | Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja Dadlani

पुजा ददलानी पुन्हा गैरहजर; तब्येतीचं कारण देऊन चौकशी टाळली

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रूझ ड्रग प्रकरणात (cruise drug case) शाहरुख खानची (shahrukh khan) मॅनेजर पुजा ददलानी (Pooja dadlani) हिला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौकशीसाठी समन्स (summons) बजावलं होतं, पण तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून पुजा ददलानी (Absent in NCB office) आजही हजर झाली नाही. याआधीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा पुजा ददलानीला चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हाही तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत यायचं टाळलं होतं.

हेही वाचा: 'क्रूझ ड्रग पार्टी' हा खंडणी उकळण्याचा कट; साईलच्या वकिलाचा दावा

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडून खंडणी घेण्यासाठी पुजा ददलानीला फोन केल्याचा खुलासा याच प्रकरणातील पंच प्रभाकर साईलनं केला होता. त्यानंतर एनसीबी आणि मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं प्रकरणाचा तपास सुरु केला. यात आर्यन खानला अटक झालेल्या दिवशी पुजा ददलानी, किरण गोसावी, सॅम डिसुझा यंच्यात फोनवर अनेकदा बोलणं झाल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. त्याचीच पुढे चौकशी करण्यासाठी पुजा ददलानीला समन्स पाठवण्यात आलं होतं. पुजा ददलानीच्या चौकशीतून अजून बऱ्याच गोष्टी उघड होतील असा मुंबई पोलिसांचा अंदाज आहे.

loading image
go to top