

BMC Muslim Corporators
ESakal
विनोद राऊत
मुंबई : महापालिका निवडणुकीत मुस्लिम महापौराच्या मुद्द्यावरून भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणजे या वेळी मुस्लिम समाजाचे पालिकेतील प्रतिनिधित्व तीनने घटले आहे. या वेळी मुंबई महापालिकेत एकूण २८ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. गेल्या पालिकेत ३१ मुस्लिम नगरसेवक होते. काँग्रेसचे सर्वाधिक १४, तर त्यापाठाेपाठ ‘एमआयएम’चे सात नगरसेवक विजयी झाले आहेत.