मुंबई : डेंगी डास प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत कामावर असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पांडुरंग तोडकर (वय ४७) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे..मुंबईत साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध भागांत सर्वेक्षण आणि डास उत्पत्तीस्थानांची शोधमोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत पालिकेच्या पीसीओ विभागातील कर्मचारी पांडुरंग तोडकर हे शनिवारी भोईवाडा येथील बीडीडी चाळ क्रमांक ६-ए परिसरात पाहणी करीत होते..Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटांनी मेट्रो धावणार, फेऱ्यांमध्येही वाढ; पाहा नवे वेळापत्रक.मुंबईत साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध भागांत सर्वेक्षण आणि डास उत्पत्तीस्थानांची शोधमोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत पालिकेच्या पीसीओ विभागातील कर्मचारी पांडुरंग तोडकर हे शनिवारी भोईवाडा येथील बीडीडी चाळ क्रमांक ६-ए परिसरात पाहणी करीत होते..डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने तपासण्याचे काम सुरू असताना तोडकर यांचा अचानक तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले..वारसाला नोकरी, लाभांचे निर्देशमहापौर रितू तावडे यांनी घटनेची माहिती मिळताच केईएम रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला पालिकेत नोकरी आणि निवृत्तिवेतनाचे सर्व लाभ तातडीने देण्याचे निर्देश दिले. मृत तोडकर यांचे पुत्र साईराज आणि इतर कौटुंबिक सदस्यांची भेट घेऊन धीर दिला.महापौरांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कायदेशीर प्रक्रिया २ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तोडकर यांच्या कुटुंबाला मिळणारे निवृत्तिवेतनाचे सर्व लाभ विनाविलंब मंजूर करण्यात यावेत आणि त्यांच्या पात्र वारसाला अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत सेवांतर्गत नोकरी देण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.