esakal | गुड न्यूज : कोरोनाच्या तीसऱ्या लाटेपुर्वी कॉकटेल औषधांच्या उपचारात पालिकेला यश!
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

गुड न्यूज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपुर्वी कॉकटेल औषधांच्या उपचारात पालिकेला यश!

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम (Donald Trump) यांना कोविडची बाधा (Corona Infection) झाल्यानंतर जी औषधे (Patent) देण्यात आली. तीच औषधे आता मुंबईतील (Mumbai) कोविड बाधीतांनाही देण्यात येणार आहे. कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणे देऊन बाधीत रुग्णांमध्ये चांगली लक्षणे ( Symptoms) दिसू लागली आहे. या उपचारात मृत्यूचे प्रमाणही (Death Rate) 70 टक्‍क्‍यांनी घटेल आहे. पालिकेच्या या प्रयोगाला (BMC experiment) यश आले असून तीसऱ्या लाटे पर्यंत मुंबईसाठी ही खुशखबर आहे. ( BMC Experiment has been successful in patent before corona third wave )

दोन मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यता आला होता. कोविडचे उपचार साधारण 13 ते 14 चालतात. मात्र,दोन मिश्रणाच्या औषधात फक्त पाच ते सहा दिवसच उपचार घ्यावे लागत असून हे मिश्रण सलाईनव्दारे दिले जात असून त्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. त्यानंतर रुग्णालयात दाखल न करता बाह्य रुग्ण सेवाही देणे शक्‍य आहे. या औषधाच्या वापरामुळे रेमडिसीव्हीर तसेच इतर स्टेरॉईडची औषधे देण्याची गरज लागत नाही. त्यामुळे रुग्णांवर होणाऱ्या साईड इफेक्‍टचा धोकाही कमी होतो. सेव्हन हिल्सचे विशेष कार्य अधिकारी डॉ.महारुद्र कुंभार आणि अधिष्ठाते डॉ.बाळकृष्ण अडसुळ यांच्या देखरेखी खाली हा प्रयोग करण्यात आला.

हेही वाचा: मुंबई : लॉकडाऊनबाबत तीन दिवसात निर्णय?; महापौरांचे सुतोवाच

अमेरिकेत नोव्हेंबर 2020 पासून या पध्दतीचा वापर केला जात असून डोनाल्ड ट्रॅमयांनाही हेच उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 10 मे 2021 मध्ये भारताच्या केंद्रीय औषधी प्रमाणके संघटनेकडे या औषधांची नोंदणी हाऊन भारताचे औषध महानियंत्रक यांनी वापरला परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबईत हे उपचार करण्यात आले.पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल,अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह राज्याचे कुटूंब कल्याण आयुक्त रामस्वामी यांच्या पुढाकाराने ही उपचार पध्दती स्विकारण्यात आली.

पालिकेचा प्रयोग काय ?

212 रुग्णांना या औषधांचे मिश्रण देण्यात आले आहे. त्यातील 199 रुग्णांचा अहवाल तयार झाला आहे. यात फक्त एकाच व्यक्तीला 48 तासानंतर प्राणवायू द्यावा लागला. तर,सर्व रुग्णांमधील ताप येणे थांबले. तर,उपचार सुरु करण्यापुर्वी 197 जणांना ताप होता,158 जणांना तापासह खोकला किंवा फक्त खोकल्याचा त्रास होता. चार जणांना कृत्रिम प्राणवायू द्यावा लागत होता. तर,फफ्फुसातील संसर्गाची बाधा एचआरसीटी स्कोअर 25 पैकी 7 ते 8 एवढा आणि एका रुग्णाचा स्कोअर 11 एकक होता. बाधीतांना पाच ते सहा दिवस उपचार द्यावे लागले.

यांच्यावर झाला प्रयोग

-18 ते 45 वयोगटातील 101 रुग्ण

-45 ते 59 वयोगटातील 45 रुग्ण

-60 वर्षावरील 53 रुग्ण

-सहव्याधी असलेले 74 रुग्ण

-सर्व रुग्ण सौम्य आणि मध्यम बाधीत

हेही वाचा: सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीला बाबा बंगालीने फसवलं; वाचा सविस्तर

पालिकेचा फायदा काय ?

पहिल्या व दुसऱ्या लाटेत 20 टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज लागली.या प्रयोगातील 0.5 टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज लागली.तसेच,रुग्णावर रुग्णालयातील उपचाराचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन पाच ते सहा दिवसांवर आला.त्यामुळे आरोग्य व्यवस्था,डॉक्‍टर वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर येणारा ताणही कमी होणार.

रुग्णाला काय फायदा?

महागड्या उपचारातून सुटका मिळण्याची शक्‍यता आहे.तसेच,औषध उपचाराचे साईड इफेक्‍ट कमी होण्याची शक्‍यता आहे.रुग्णालयात फार काळ राहावे लागणार असल्याने मानसिक ताण तसेच आर्थिक ताण येणार नाही.

यांच्यावर होऊ शकतात उपचार

-12 वर्षापेक्षा अधिक वय आणि 40 किलोपेक्षा जास्त वय

-सौम्य ते मध्यम लक्षणाचे रुग्ण

-प्राणवायूची गरज नाही पण प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका.

-मधुमेह,मूत्रपिंडाचे आजार,ह्दयविकार,दमा त्याच बरोबर श्‍वसनाचे आजार असलेल्यांनाही

-उच्च रक्तदाब,सिकलसेस मेंदूविषयक व्याधी असलेले.

loading image