esakal | लॉकडाऊनबाबत तीन दिवसात निर्णय ? महापौर किशोरी पेडणेकर यांचे सुतोवाच
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor kishori pednekar

मुंबई : लॉकडाऊनबाबत तीन दिवसात निर्णय?; महापौरांचे सुतोवाच

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : व्यवसाय नियमीत करण्याची परवानगी मिळण्यासाठी मुंबईतील व्यापाऱ्यांनी (Mumbai Traders) आंदोलन केले असून महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. यावर व्यापाऱ्यांना राजकरण्यांकडून (Politician) उकसवले जात आहे. असा आरोप करत लोकांचे जिव वाचविणे आपले कर्तव्य असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यावर तोडगा काढतील.पुढील दोन तीन दिवसात निर्णय होऊ शकतो असा विश्‍वास महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी व्यक्त केला. (Lockdown may open in three days says mayor Kishori pednekar)

व्यापाऱ्यां बरोबरच सर्व सामान्यांचे नुकसान कोविड काळात झाले आहे.आता कोविडचा संसर्ग नियंत्रणात आलेला असला तरी तो संपलेला नाही.अजूनही काही विभागात कोरोनाचा प्रार्दुभाव आहे. येत्या दोन तीन दिवसात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. व्यापारी संघटनांच्या मागे वेगळे चेहरे आहेत. दबावतंत्र वापरतानाही जीवाची पर्वा केली पाहिजे. आम्हाला मुंबईतील नागरीकांची चिंता आहे. असेही महापौरांनी नमुद केले. कोण काय बोलतयं याकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमचे काम करत असू असा टोलाही त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला. गुरुवार (ता.15) मुंबईतील लॉकडाऊनबाबत महत्वाची बैठक होण्याची शक्‍यता आहे. त्यात सध्याच्या नियमात काही प्रमाणात सुट मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: रायगड जिल्ह्यात कोसळला मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती!

..तर तिसरी लाट रोखता येणार

तीसरी लाट रोखण्यासाठी लसिकरण होणे गरजेचे आहे.मुंबईत आता पर्यं त49 लाख नागरीकांनी पहिला डोस आणि 13 लाख नागरीकांनी दोन डोस घेतले आहेत.रविवारी मुंबईला 1 लाख 85 हजार डोस मिळाले.जर,मुंबईला आवश्‍यक साठा उपलब्ध करुन दिल्यास अधिक वेगाने लसीकरण करुन तीसरी लाट रोखण्यास मदत होईल असेही महापौरांनी नमुद केले.

loading image